sharad pawar - Modi
शरद पवारांचा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभे न राहण्याचा निर्णय
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. येत्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुलगी खा. सुप्रिया सुळे व नातू पार्थ पवार यांना संधी देत नव्या पिढीला राजकारणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी सर्वांना हा धक्का दिला. त्यांच्या जागी विजयसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढवतील अशी अटकळ आहे.
