राज्य सरकारला ही दिला सल्ला
मुंबई, दि. २६: राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बारसू रिफायनरी शी संबंधित आंदोलनाबाबत त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला. या विषयाबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्थानिक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते हे पाहण्याची गरज आहे. यासाठी उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी सामंत यांनी दाखवली.”
पुढे ते म्हणाले की, “एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आले. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे. उद्या होणाऱ्या बैठकीत काही मार्ग निघाल्यास आनंद आहे. जर नाही निघाला तर त्यावर मार्ग काढण्यासंबंधात चर्चा करता येईल असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.
