संचारबंदीचा आदेश डावलून शहरात फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाड्या १५ दिवसांसाठी जप्त; सातारा पोलिसांची शक्कल
सातारा : सातारा पोलिसांनी कामाशिवाय फिरणाऱ्या टवाळखोर दुचाकीस्वारांना दणका दिला आहे. संचारबंदीचा आदेश डावलून सातारा शहरात फिरणाऱ्या नागरिकांच्या दुचाक्या सातारा पोलिसांनी १५ दिवस जप्त करण्याचा निर्णय घेत तशी कार्यवाही शनिवारी केली. आज शनिवारी १० हुन अधिक दुचाक्या जप्त करण्यात आल्या.
