Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कोरोनाशी लढाईत खारीचा वाटा उचला” पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन

“कोरोनाशी लढाईत खारीचा वाटा उचला” पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन

नवी दिल्ली: जगासोबत भारतातही (कोविड-१९) कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. केंद्र सरकारनेही यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानावर उपाय म्हणून विशेष पॅकेजची घोषणा कालच केली. पंतप्रधान नरेंद्र यांनी आज देशाला उद्देशून एक मागणं मागितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला PM-Cares फंडात आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात केलेल्या ट्विट मध्ये ते म्हणतात की, “देशभरातील लोकांनी कोविड-१९ च्या विरोधात लढाईत सहकार्य करण्याची इच्छा प्रकट केली आहे. या भावनेचा सन्मान करत “PM-CARES” चे गठन केले आहे. निरोगी भारताच्या निर्माणासाठी हे खूपच उपयुक्त ठरेल.”

पुढे ते म्हणाले की, “देशवासियांना माझे आवाहन आहे की त्यांनी कृपया “PM-CARES” फंडात आपलं योगदान देण्यासाठी पुढे यावे. या निधीचा उपयोग पुढेही येऊ शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत केला जाऊ शकतो.”

जर कोरोना व्हायरस च्या प्रदूर्भावाच्या काळात आपली आर्थिक क्षमता उत्तम असेल तर आपण पुढील तपशील पाहून पैसे दान करू शकता. सध्या देशात लॉकडाउन मुळे आर्थिक आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत किती लोकं पुढे येऊन मोदींच्या आवाहनाला साथ देतात हे पाहणे लक्षणिय ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *