शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची अलिबाग येथील मेळाव्यात गर्जना
अलिबाग/अहमदनगर : शिवसेना संपवण्याचं कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथल्या मेळाव्यात बोलत होते. ठाकरे आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दुसरी सेना अस्तित्वात येऊ शकत नाही, असं ते म्हणाले.
सेना बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या जिल्ह्यातल्या भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांच्यावर राऊत यांनी घणाघाती टीका केली. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यावेळी उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यात आज महेंद्र दळवी समर्थकांनी देखील मोर्चा काढला.
अहमदनगर येद शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मेळावा झाला. या मेळाव्याला जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह महापौर, नगरसेवक आणि अहमदनगरच्या दक्षिण भागातील सर्व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. चंद्रपूर शहरातही वरोरा नाका परिसरात जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी
