Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

संजय राऊत म्हणाले “या मला अटक करा”

‘ईडी’ ची नोटिस आल्यामुळे संतापले राऊत

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथी करणाऱ्या शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना  उद्याच हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

नोटीसनंतर राऊत म्हणाले की, मला अलिबाग येथील बैठकीला जायचे असल्याने मी मंगळवारी तपास यंत्रणेसमोर हजर राहू शकणार नाही. ईडीचे समन्स हे कट असल्याचे सांगत त्यांनी ट्विट केले की, “मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!”

ईडीने ५ एप्रिल रोजी राऊत यांची संपत्ती जप्त केली होती

१,०३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने महाराष्ट्रातील एक व्यावसायिक आणि राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली होती, त्यानंतर संजय राऊत यांचेही नाव या प्रकरणात जोडले गेले. ५ एप्रिल रोजी ईडीने याच प्रकरणात मुंबईतील राऊत यांचे फ्लॅट व अलिबागमधील भूखंड जप्त केला होता.

संजय राऊत यांच्या पत्नीचाही आरोप

ईडीने प्रविण यांना अटक केली तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र आहेत. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ८३ लाखांचे कर्जही दिले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला ५५ लाख रुपये परत केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *