पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार : संजय निरुपम
वाराणसी: काँग्रेस नेते मुंबई काँग्रेस चे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली आहे. ते म्हणाले की, वाराणसीच्या लोकांनी ज्या व्यक्तीला निवडलंय तो औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहे. कारण, त्यांनी कॉरिडोर प्रोजेक्ट च्या नावाखाली शेकडो मंदिरं तोडली आणि जिझिया करा च्या रुपात विश्वनाथ मंदिर मध्ये दर्शनाच्या नावाखाली ५०० रुपयांचे प्रवेश शुल्क लावले आहेत. ते म्हणाले की जे काम औरंगजेब करू शकला नाही, ते नरेंद्र मोदी करत आहेत.
काँग्रेस ने अजय राय ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वराणसीच्या जागेचे तिकीट दिले आहे. काल मंगळवारी संजय निरुपम खास अजय राय यांच्या प्रचारासाठी चौक सभा घेण्यासाठी आले होते. ते म्हणाले की, भाजपवाले रोज नवीन खोटं बोलत आहेत आणि खोटा प्रचारही करत आहेत. परंतु आता आधुनिक औरंगजेबाला भाजपवालेही त्रस्त आहेत.
काँग्रेस महासचिवांद्वारे पंतप्रधानांना दिलेली रावणाची उपमाही योग्य असल्याचे संजय निरुपम म्हणाले. ते म्हणाले की मी तर त्यांना औरंगजेब म्हणत आहे. कारण पंतप्रधानांन इतका अहंकार दुर्योधन आणि रावणालाही होता.
