केंद्र सरकारने अल्कोहोल युक्त सॅनीटायझरच्या निर्यातीवरचे सर्व निर्बंध हटवले
नवी दिल्ली: अल्कोहोल युक्त सॅनीटायझरच्या निर्यातीवरचे सर्व निर्बंध केंद्र सरकारनं हटवले आहेत. अल्कोहोल युक्त डिस्पेन्सर पंप असलेल्या हँड सॅनीटायझर्सच्या निर्यातीवरचे निर्बंध तत्काळ प्रभावानं उठवण्यात आल्याचं परदेशी व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. त्यामुळे आता यापुढे अल्कोहोल युक्त सॅनीटायझर कोणत्याही स्वरुपात आणि पॅकेजिंगमध्ये निर्यात करता येईल. स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि वस्तूंची कमीत कमी आयात करण्याच्या उद्देशानं वातानुकूलन यंत्र आणि रेफ्रीजरेटर्सच्या आयातीवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. वातानुकूलन यंत्र आणि रेफ्रीजरेटर्सच्या आयतीच धोरण बदललं असून आता त्यावर बंदी असल्याचं परदेशी व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
