Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जीएसटी महसूल संकलनात सांगली जिल्ह्याचा देशात डंका

वस्तू आणि सेवाकर(GST) संकलनात देशात अव्वल

सांगली, दि. १९: वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा हा राज्यातच  नव्हे तर देशात अव्वल ठरला आहे. सांगलीच्या जीएसटी विभागाने तब्बल ९१ कोटी रुपयांचा  महसूल संकलित केला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २१  टक्क्यांनी   वाढ   झाली   आहे.  सांगली   जीएसटी विभागाने   गेल्या    वर्षभरात   जीएसटी   संकलनासाठी  काटेकोर  नियोजन  केलं  होतं.  ऑक्टोबर  २०२१  मध्ये सांगली  जीएसटी  विभागाचं  कर  संकलन  हे  ७५ कोटी रुपये  इतकं  होतं.  यंदा   ऑक्टोबर  महिन्यात  ते  ९१ कोटी रुपये  इतकं  झालं  आहे.  हे करन संकलन देशाच्या आणि   राज्याच्या   तुलनेत   सर्वाधिक  असल्याचा   दावा सांगली जीएसटी विभागानं केला आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *