“ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला आळा घाला” – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सत्तार बोलत होते. बैठकीला दोन्ही जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी आणि कक्ष अधिकारी उपस्थित होते.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले.
