समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही चालूच; भीषण अपघातात झाली मोठी मनुष्यहानी
बुलढाणा, दि. १: नव्याने झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. मध्यरात्री बुलढाणा येथे भीषण रस्ता अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड ते सिंदखेड राजा दरम्यानच्या पिंपळखुटा शिवारात समृद्धी महामार्गावर एक मध्यरात्री एक भीषण अपघात झाला असून यात २५ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण बचावले आहेत. अपघातातून बचावलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस आणि घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते औरंगाबाद मार्गावर बस प्रथम उजव्या बाजूच्या लोखंडी खांबाला धडकली आणि नंतर अनियंत्रित होऊन दोन लेनमधील काँक्रीट दुभाजकावर आदळून उलटली.
बस पलटी होताच ती डाव्या बाजूला उलटली, त्यामुळे बसचा दरवाजा खाली गाडला गेला. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याचा मार्गच उरलेला नाही. अपघातानंतर बसचे बरेच डिझेल रस्त्यावर पसरले आहे, त्यामुळे एकतर डिझेल टाकी फुटून डिझेल टाकीपासून इंजिनला जाणारा पुरवठा पाईप फुटून बसला आग लागल्याची भीती व्यक्त होत आहे.
जे वाचले त्यांच्या म्हणण्यानुसार, फक्त तेच लोक वाचले ज्यांनी खिडकीची काच हाताने फोडून बाहेर पडण्यात यश मिळवले. बसमध्ये ३३ प्रवासी होते, पोलिसांनी २५ मृतदेह बाहेर काढले आहेत. बसमधून बाहेर काढलेले मृतदेह जळाले आहेत. त्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
बुलढाण्याचे डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी सांगितले की, बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर ३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागल्याने किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे. बुलढाणा एसपी सुनील कडासेन यांनी सांगितले की, बसमध्ये एकूण ३३ लोक होते, त्यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. बसचा चालक बचावला असून टायर फुटल्यानंतर बस उलटली, त्यामुळे बसने पेट घेतला.
