“नाशिक, रायगड, अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार” – खासदार संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर, दि.१६: खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलन पार पडलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित होते.
उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना खा. संभाजीराजे म्हणाले की शुक्रवारी मुंबईत मराठा समन्वयकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असताना आपणही एक पाऊल पुढे टाकू असं सांगत त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र यावेळी त्यांनी नाशिक, रायगड. अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
