साई व एनसीओई मुंबई करणार, पुरुष आणि महिला कुस्तीपटूंच्या खुल्या निवड चाचणीचे आयोजन
मुंबई, दि. ०६: भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOE), मुंबई तर्फे १२, १३ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय क्रीडा प्राधिकरण, श्री अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, आकुर्ली मार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ येथे पुरुष आणि महिला कुस्तीपटूंसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOE) च्या निवड झालेल्या क्रीडापटूंसाठी दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा पुढील प्रमाणे आहेत:
पोषण तज्ञांनी शिफारस केलेल्या वास्तविकतेनुसार भोजन सुविधा आणि वैयक्तिक पोषण योजना, चांगल्या दर्जाच्या निवास सुविधा, प्रशिक्षकांच्या तज्ञ पॅनेलद्वारे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा सामुग्री संच, जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण पायाभूत सुविधा; देशांतर्गत तसेच परदेशी स्पर्धात सहभागी होण्याची संधी (निवडलेल्या खेळाडूंसाठी) आणि शैक्षणिक खर्च सहाय्य, वैद्यकीय सुविधा, सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञांकडून नवीनतम वैज्ञानिक समर्थन, फिजिओथेरपिस्ट, मसाज थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ इ.
महत्वाची माहिती –
° रिक्त जागा: ग्रीको रोमन – १०, फ्री स्टाईल – २, महिला कुस्ती – २
° उपस्थित राहण्याची वेळ – १२/०९/२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता.
° स्थळ: भारतीय क्रीडा प्राधिकरण श्री अटलबिहारी वाजपेयी, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई — ४००१०१.
° निवड चाचण्यांमधील सहभागींना भोजन आणि निवास सुविधा प्रदान केली जाणार नाही.
पात्रता निकष
- U-१७, U-२० आणि U-२३ वयोगटातील मुले आणि मुली.
- मुलांचे वजन श्रेणी ५७ किलो आणि त्याहून अधिक: फ्री स्टाइल.
- मुलांचे वजन श्रेणी ६५ किलो + ते १३० किलो: ग्रीको रोमन.
- मुलींचे वजन श्रेणी ५० किलो आणि त्याहून अधिक: महिला कुस्ती.
- राज्य स्पर्धेतील पदक विजेता/विजेती.
- राष्ट्रीय स्पर्धेत ५ व्या स्थानापर्यंत पात्र ठरलेले कुस्तीपटू.
- राष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये ५ व्या स्थानापर्यंत पात्र ठरलेला कुस्तीपटू.
टीप: मागील २ वर्षांपर्यंतच्या (चाचणीच्या तारखेपासून) कमाल यशांचा विचार केला जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची वय पडताळणी चाचणी घेतली जाईल.
चाचणीच्या वेळी आवश्यक असणारी कागदपत्रे.
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- क्रीडा यश प्रमाणपत्रे
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
- पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (२)
अधिक तपशिलांसाठी कृपया संपर्क साधा- मुख्य कुस्ती प्रशिक्षक राजसिंग चिक्कारा – 9416285830; एचपीएम रेसलिंग क्लबचे श्याम बुडाकी – 9481775709; सहाय्यक कुस्ती प्रशिक्षक अमोल यादव, – 9503404427; किंवा सहाय्यक कुस्ती प्रशिक्षक शिल्पी शेरॉन – 9996292300.
