९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर
नाशिक: ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाशिक येथे काल महामंडळाची बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यंदाचं संमेलन नाशिक येथे येत्या २६ ते २८ मार्चला होणार आहे.
