सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १६ हजार घरं उपलब्ध करुन देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई: मुंबई शहरात सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १६ हजार घरं उपलब्ध करुन देणार असल्याचं, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यातील सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं.