राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती
मुबंई, दि.२१: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली निलेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दि. २० ऑक्टोबर २०२१ रोजी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधी करिता ही नियुक्ती असेल.
रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या महिला आघाडी प्रमुख असून पवार परिवाराशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. चित्रा वाघ भाजपवासी झाल्यानंतर चाकणकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या महिला आघाडीची कमान सोपवण्यात आली.
