Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईत उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबईत उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबईदि. २४: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूरएस. व्ही. रोडहिरालाल भगवती हॉस्पिटलजवळबोरिवली (पश्चिम)मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ होईल.

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्याउद्योगकॉर्पोरेट संस्था व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याशिवाय विविध शासकीय आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध समाज घटकांकरीता राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दहावीबारावी उत्तीर्णआयटीआयपदवीधरअभियंते अशा विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी व्हावेअसे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *