Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“…पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते” – मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची बाजू सांभाळत रोहित पवार यांचा विरोधकांना टोला

“…पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते” – मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची बाजू सांभाळत रोहित पवार यांचा विरोधकांना टोला

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत सध्या विरोधीपक्षातील काही नेत्यांकडून टीका केली जात आहे. काहीसा सौम्य स्वभाव असलेल्या उद्धव ठाकरेंना राजकारणाच्या सुरुवातीपासूनच अशा टीकेचा सामना करावा लागत आहे. पण या टिकेवर मात करत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. सध्या राणे परिवाराकडून मुख्यमंत्र्यांवर टीकेचा भडिमार चालू आहे. याच टीकेला शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सडेतोड उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल आणि त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला.”

भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सध्या सातत्याने टीका करताना दिसत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *