Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्देश

मुंबई, दि. २५: येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान न करता योग्य सन्मान राखला जाईल याची दक्षता  घ्यावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

या राष्ट्रीय, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यावेळी मोठ्या प्रमाणात छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात-रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज आढळतात त्यामुळे नागरिक, विद्यार्थी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. त्यामुळे अशासकीय संस्था व इतर संघटनांच्या मदतीने राष्ट्रध्वज गोळा करुन तहसील कार्यालयात व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत, असे आवाहनही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *