रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर; सलग पाचव्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय
मुंबई, दि. ९: रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात सलग पाचव्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात ७ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वर्तवला आहे. डिजिटल माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी रिझर्व्ह बँक लवकरच दिशानिर्देश जारी करणार आहे. यामुळे या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि ग्राहक केंद्री व्यवस्था वाढू शकेल. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये UPI द्वारे व्यवहार करण्याची कमाल मर्यादा १ लाखांवरुन वाढवून ५ लाख करायचा निर्णयही गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज जाहीर केला.
Source – AIR
