वायू प्रदूषण करणाऱ्या मुंबईतील २७८ बांधकामांना काम थांबवण्याची पालिकेकडून नोटीस
मुंबई, दि. १३: वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं २७८ बांधकामं थांबवण्याची नोटीस बजावली आहे. शहरात ६ हजाराच्या वर बांधकामं होत असून त्यातल्या २ हजार ९०० बांधकामांना इशारा नोटीशी बजावल्या आहेत.पालिकेनं वॉर्ड पातळीवर ९५ विशेष पथकंही स्थापन केली आहेत.ही पथकं बांधकाम स्थळांचं परीक्षण करून पालिकेच्या धूळ निवारण मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणारांना नोटीसा बजावत आहेत.आतापर्यंत १९० बांधकाम स्थळांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.महानगरपालिकेने शहरात तीन ठिकाणी बाह्य धूळ निवारण केंद्र आणि धूळ निरीक्षण प्रणाली बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.ही केंद्र जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड,हिसर पथकर नाका आणि मुलुंड पथकर नाका इथं सुरू केली जाणार आहेत.पुढील महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्यानं ही प्रक्रिया पूर्ण होईल.ही केंद्रे प्रदूषण पातळीचं सतत निरीक्षण करून मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करतील.
Source – AIR
