“रिझर्व बँक एका योजनेवर काम करत आहे” – RBI गव्हर्नर शक्तीकांत दास
मुंबई दि.२७: कोविड -१९ च्या संकटानंतर देशाची अर्थव्यवस्थेवर रिझर्व बँकेचे लक्ष असून एका योजनेवर बँक काम करत असल्याचं रिझर्व बँकेचे गर्वनर शक्तीकांत दास यांनी आज सांगितलं. फायनांशियल डेली बिजनेस स्टॅडंर्डनं आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये दास बोलत होते. बँकिंग क्षेत्र भक्कम आणि स्थिर राहिल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊनच्या काळात बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. बँकानी कर्ज देताना स्वयंसंरक्षणाचा मार्ग घेऊन बचाऊ धोरण स्वीकारू नये असा इशारा दिला. बँकानी कर्ज देताना विरोध करण्याऐवजी आपली जोखिम प्रबंधन प्रणाली अधिक सक्षम करावी तसंच कार्यपद्धतीत लवचिकता आणावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
कर्ज देणं टाळणं हे स्वयंसंरक्षण असू शकेल मात्र बँका त्यामुळे नफा गोळा करु शकणार नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी कर्जात वाढ होणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. कोविड १९ महामारी संदर्भातील वितरण प्रणालीवर टप्प्यानं काम करत असल्याचही दास म्हणाले.
केंद्र सरकारच्या या काळातील कामाच त्यांनी कौतुक केलं सरकार आर्थिक जबाबदारी स्वीकारुन विवेकानं काम करत आहे, असंही ते म्हणाले.
Source – AIR
