रिझर्व्ह बँकेतर्फे नागरी सहकारी बँकांसाठी सुधारित नियामक चौकट निर्गमित
विशेषतः, एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या टीयर-१ मधे नागरी सहकारी बँकासाठी किमान दोन कोटी रुपये आणि इतर सर्व नागरी सहकारी बँकांसाठी पाच कोटी रुपये निर्धारित केले आहेत. आर्थिक क्षेत्रातल्या, वाढीच्या संधींना चालना देण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकाच्या शाखा विस्तारासाठी स्वयंचलित मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे सक्षम आणि व्यवस्थापनाच्या योग्यतेच्या निकषांनुसार नवीन शाखा उघडता येतील. गृहकर्जाच्या संदर्भात, रिझर्व्ह बँकेने कर्ज ते मूल्य गुणोत्तराच्या आधारे जोखीम निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे भांडवली बचत शक्य होणार आहे. नागरी सहकारी बँका क्षेत्र अधिक मजबूत बनवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असून, नागरी सहकारी बंकांची वाढ करण्याची क्षमता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
