Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रयत शिक्षण संस्था “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९” ला करणार २ कोटींची मदत : शरद पवार

रयत शिक्षण संस्था “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९” ला करणार २ कोटींची मदत : शरद पवार

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९” नावाने एक खाते उघडले असून. या खात्यामार्फत देणग्या स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यात आता पर्यंत मोठमोठे उद्योजक, खेळाडू, अनेक दानशूर व्यक्तींनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेल्या शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून जीच नाव घेतलं जातं तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आपली एक दिवसाचा पगाराची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भातील माहिती त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

यात ते म्हणालेत की,
“#Covid_19 ह्या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र, #Corona विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

राष्ट्रीय महत्त्वाच्या कोणत्याही प्रसंगी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्था नेहमीच पुढे आल्या आहेत. परंतु संपूर्ण #lockdown मुळे रोग निवारण कामी शिक्षण संस्थांना सक्रिय होता येत नाही.

अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *