राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने पटकावला दूसरा क्रमांक
तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीनं देशात दुसरा क्रमांक पटकावला असून महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकंदर चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी, गैर शासकीय संस्थांमधून औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला तिसरा तर जल जागृतीसंदर्भात उल्लेखनीय कार्याबद्दल ऍग्रोवनला सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्काराचा यात सामावेश आहे. या पुरस्कारांमध्ये राज्य श्रेणीत उत्तर प्रदेशला पहिलं स्थान प्राप्त झालं आहे. राजस्थान दुसऱ्या आणि तमिळनाडु तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. जल शक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. सर्वश्रेष्ठ राज्य, जिल्हा, पंचायत आणि उद्योगसहित ११ श्रेणींमध्ये ५७ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
