अखेर रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव साजरा करण्यास काही अटींवर परवानगी
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातला सर्वांत मोठा शिमगोत्सव साजरा करायला काही अटींवर परवानगी दिली आहे. मात्र अनेक बाबतीत कडक निर्बंध जाहिर करण्यात आले आहेत.
उत्सवाच्या काळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीमध्ये मुखवटे लावणं, पालखी सजविणं ही कामं करता येणार आहेत. ग्रामदैवताची पालखी नाचवणं हा जिल्ह्यातला सर्वांत मोठा खेळ असतो. यावर्षी त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मुंबई-पुण्यातल्या चाकरमान्यांनी यावर्षी आपापल्या गावी येऊ नये, त्याऐवजी होळीचा कार्यक्रम ऑनलाईनच पाहण्याची सोय करावी अशी विनंती ग्रामस्थांनी करावी, अशी सूचना ग्रामस्थांना करण्यात आली आहे.
