शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर राज्य मागासवर्गिय आर्थिक विकास महामंडळानं दिलेली कर्जही राज्य सरकारनं माफ करावी, अशी रामदास आठवले यांची मागणी
शेतकऱ्यांना दिल्या जाणा-या कर्जमाफीच्या धर्तीवर राज्यातील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात आलेली कर्ज शासनानं माफ करावीत अशी मागणी रिपाई आठवले गटानं केली आहे.
या मागणीसाठी येत्या १० जानेवारीला संपूर्ण राज्यात रिपाइंतर्फे आंदोलन केलं जाईल अशी घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.या आंदोलनादरम्यान प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांसमोर निदर्शनं केली जातील अशी माहिती रिपाईनं पत्रक प्रसिद्ध करून दिली आहे.
(सौजन्य – AIR)
