राजू शेट्टींनी आघाडीकडे मागितल्या आहेत दोन जागा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप–शिवसेनेची साथ सोडून आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला किमान दोन तरी जागा द्याव्यात, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातकणंगले येथे राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना–भाजप युतीने मित्र पक्षांची दखल न घेतल्याने नाराज झालेल्या राजू शेट्टींनी आघाडी सोबत मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
