मोदी एकटे काँग्रेस बरोबर कबड्डी खेळायला निघाले आहेत पण आता त्यांना आमच्या मजबूत टीम ने पकडलं : राहुल गांधी
काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आज उना येथील सभेत म्हणाले की, “हिमाचल चे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग माझे राजकीय गुरू आहेत, त्यांचा मी सन्मान करतो. मी मोदींसारखा नाही ज्यांनी आपले कोच लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित केले. राहुल म्हणाले मोदी एकटे काँग्रेस बरोबर कबड्डी खेळायला निघाले आहेत पण आता त्यांना आमच्या मजबूत टीम ने पकडलं आहे आणि ते आऊट होऊनच जाणार. ते एकटेच सर्व निर्णय घेतात, व्यापाऱ्यांचा काय दोष होता? सामान्य माणसाचा काय दोष होता? जीएसटी लावला. नोटबंदीने त्यांना मारलं आता. हिंदुस्थान च्या जनतेने त्यांना आता जखडलं आहे, त्यांचं काम तमाम केलं आहे.”
राहुल गांधी पुढे म्हणाले की संसदेत तुम्ही उत्तर नाही दिलंत, दीड तास संसदेत बोललो पण डोळ्याला डोळा नाही मिळवू शकलात. राहुल यांनी आरोप केला आहे की त्यांनी चोरांची चौकीदार केली, अरुण जेटली यांच्या मुलीच्या खात्यात पैसे टाकले तसेच एका मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या खात्यातही पैसे टाकले गेले.
राहुल म्हणाले की जनतेच्या आवाजाने आणि सत्याने मोदींना पकडलं आहे, तुम्ही माझ्या परिवराचा द्वेष करा, मी तुम्हाला प्रेमचं देईन.
