विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
मुंबई, दि. ०८: राज्य विधानसभेच्या अध्यक्ष पदावर आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र, अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्यानं नार्वेकर यांची निवड बिनविरोध होत आहे.
Source – AIR
