Rahul Gandhi 2
मी भारतीय हवाई दलाच्या सर्व पायलटना सॅल्यूट करतो : राहुल गांधी
आज पहाटे भारतीय हवाई दलाच्या मिराज २000 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मोठी कारवाई केली. 12 विमानांनी 1 हजार किलो बॉम्बचा वर्षाव करत जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याच्या या मोठ्या कामगिरी नंतर भारतीय सैन्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भारतीय सैन्याला सॅल्यूट केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्वीट करताना भारतीय जवानांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. “मी भारतीय हवाई दलातील पायलटना सॅल्यूट करतो,”असेही ते म्हणाले आहे.
🇮🇳 I salute the pilots of the IAF. 🇮🇳
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2019
