“एवढं घाबरू नका मुख्यमंत्री महोदय” – यूपीत अडवणूक झालेल्या राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री योगींना खडे बोल
उत्तर प्रदेश, दि.१: उत्तर प्रदेश येथील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना आज उत्तर प्रदेश पोलिसांकडून अपेक्षेप्रमाणे अटकाव करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर राहुल गांधी व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
घटनेनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की मला पोलिसांकडून धक्काबुक्की करत खाली पाडण्यात आले. ट्विटर च्या माध्यमातूनही राहुल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाण साधला. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “दुःखाच्या क्षणात आपल्यांना एकटं सोडलं जात नाही. यूपीतल्या जंगलराजची अशी परिस्थिती आहे की शोकमग्न परिवाराला भेटणेही सरकारला घाबरवून टाकतं. एवढं घाबरू नका मुख्यमंत्री महोदय.”
