Rahul Gandhi 2
गायब हो गया….आणि राहुल गांधींचे आरोप
आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुनः एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल बाबत आरोप केले. काल सुप्रीम कोर्टात राफेल शी निगडित फाईल गहाळ झाल्याचा सरकारी वकिलांनी जो खुलासा केला त्यावर राहुल गांधींनी कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. ते म्हणले की आधी राफेल चे पैसे चोरी झाले आणि आता फाईल. ते थेट नरेंद्र मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत म्हणाले की, “एफ.आय.आर. ही मोदींवर व्हायला पाहिजे पण इथे ती करण्यात येत आहे चोरी पकडणाऱ्या माध्यमावर. ह्याला म्हणतात अंधेरी नगरी, चौपट राजा”
अनिल अंबानींचाही थेट उल्लेख करत ही डील त्यांनाच मिळावी म्हणून प्रधानमंत्री फ्रान्स च्या कंपनी आणि सरकारशी स्वतः समांतर चर्चा करत होते. त्यांच्यामुळेच ही विमाने खरेदी करायला वेळ गेला.
पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईक नंतर राफेल चा मुद्दा काही काळ शांत होता पण राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेने पुन्हा तो उफाळून वर आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप पुन्हा झाल्यामुळे भाजप आणि पंतप्रधान मोदी त्यांना कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
