“उद्योगपतींना करात सूट देण्यापेक्षा गरिबांना पैसा द्यावा….” – राहुल गांधी यांचा मोदी सरकारला टोला
नवी दिल्ली दि.२६: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या २०१९-२० सालच्या ताज्या अहवालाचा हवाला देत टीका केली आहे. या संदर्भात एक ट्विट करत ते म्हणाले की, “RBI नेही त्याच गोष्टीची पुष्टी दिली आहे ज्याबाबत गेले काही महिने मी सातत्याने बोलत आहे. हे गरजेचं आहे की: सरकारने खर्च वाढवायला पाहिजे, कर्ज नाही. उद्योगपतींना करात सूट देण्यापेक्षा गरिबांना पैसा द्यावा …. मागणी वाढवून अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरुवात करावी.”
पुढे केंद्रावर तिरकस बाण मारत ते म्हणाले की, “माध्यमांद्वारे लक्ष विचलित करण्याने न गरिबांना मदत होणार की आर्थिक संकटाचा गुंता सुटेल.”
RBI चा वार्षिक अहवाल काय म्हणतो
काल मंगळवारी जाहीर झालेल्या २०१९-२० च्या आर्थिक अहवालात ‘आरबीआय’ ने केंद्र सरकारला कोरोनापूर्व अर्थव्यवस्था साकारण्यासाठी खर्च वाढवून चालनाला मागणी द्यावी लागेल. सरकारने उपभोग वाढीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत मांडत आरबीआयने सरकारला अप्रत्यक्ष कर्जमाफीचाच पर्याय सुचवला असल्याचे मानले जाते.
