‘चौकीदार चोर है’ वक्तव्यावर राहुल गांधी यांची सुप्रीम कोर्टात दिलगिरी
‘चौकीदार चोर है’ या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या संदर्भात न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. आपल्या स्पष्टीकरणात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त करताना निवडणुकीच्या वातावरणात एका आवेशात आपल्याकडून अजाणतेपणी ही चूक झाल्याचे म्हटले आहे. राफेल प्रकरणावरील फेरविचार याचिकेतील संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनिय कागदपत्रे कोर्टात ग्राह्य धरली गेली आहेत. त्यानंतर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ असे विधान केले होते. पण आता त्यांनी याचे सारे खापर आपल्या विरोधकांवर फोडत, त्यांच्याकडून माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असे म्हणत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
