फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा अँटीग्वा आणि बार्बुडा या देशातूनही बेपत्ता
फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा अँटीग्वा आणि बार्बुडा या देशातूनही बेपत्ता झाला आहे. चोक्सीचे वकील विजय अगरवाल यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ही बाब उघड केली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालानालायाला चोक्सी हवा आहे.
चोक्सी बेपत्ता झाला असल्याने त्याचे कुटुंबीयही काळजीत असल्याचं वकिलांनी सांगितलं. अँटीग्वा इथल्या पोलिसांनी चोक्सीला शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. परंतू मेहुल चोक्सी च्या आधीच्या प्रतापांवरून तो खरच बेपत्ता झाला आहे की पुन्हा कोणा नव्या देशात फरार झाला आहे हा संशोधनाचा विषय होईल. तूर्तास तरी मेहुल चोक्सी भारतीय तपास संस्थांच्या आवाक्यात नाही.
