सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन होणार
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यंदाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. याबाबत काल परीक्षा मंडळाची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र आता त्या ११ एप्रिलपासून घेण्यात येतील. प्रत्येक विषयासाठी ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा यात घेण्यात येणार आहे. दरम्यान मागील वेळी परीक्षेत झालेला तांत्रिक गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठानें परीक्षेचं वेळापत्रक लवकर जाहीर करावं, अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे.