Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे महानगरपालिका ‘या’ व्यक्तींसाठी थेट घरी जाऊन लसीकरण करणार

पुणे महानगरपालिका ‘या’ व्यक्तींसाठी थेट घरी जाऊन लसीकरण करणार

अनाथ आश्रमातील व्यक्ती, एचआयव्हीबाधित, मानसिक दृष्ट्या किंवा इतर आजारानं त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी पुणे महानगरपालिकेने थेट घरी जाऊन लसीकरण करण्याकरता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

त्या अंतर्गत पाच मोबाईल व्हॅन्सचे लोकार्पण काल महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकरता पहिल्या टप्प्यात या व्हॅन्स सेवा देणार आहेत.

तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने खासगी रहिवाशी संस्थांना आपल्या आवारात लसीकरण मोहीम राबविण्याची परवानगी दिल्यानंतर काल पाहिलं लसीकरण देवनार इथल्या रहेजा एक्रोपोलिस या गृहनिर्माण संस्थेत झालं.

‘सुरानाहॉस्पिटल’च्या साहाय्यानं इथल्या रहिवाशांसह इथं घरकाम करणाऱ्या महिला, वाहनचालक, सुरक्षारक्षक अशा ६०० जणांना कोविशील्ड लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *