Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने आयोजित “घरगुती गणेशोत्सव सजावट (ऑनलाईन) प्रदर्शन २०२० चे विजेते जाहीर

“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने आयोजित “घरगुती गणेशोत्सव सजावट (ऑनलाईन) प्रदर्शन २०२० चे विजेते जाहीर

पुणे: यंदाच्या या कठीण परिस्थितीत कोणासही आप्तस्वकियांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणे शक्य नव्हते. याची उणीव भासू नये याकरीता समितीने आपल्या अधिकृत ईमेल आयडी मार्फत सर्वांच्या घरगुती गणेश उत्सवाची छायाचित्रे संकलित करून ती फेसबुक पेजवरून ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित केली. या अभिनव संकल्पनेस सर्वांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

याच प्रतिसादाच्या जोरावर समितीने सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री गणेश उत्सव सजावटीसाठी विशाल माने (बेळगाव), तुषार घुले (मांजरी), शेखर पवार (म. गांधीनगर) अन् श्री गौरी गणपती सजावटीसाठी प्रसाद चिले (लोणी काळभोर) अशी एकूण ४ पारितोषिके ऑनलाईन स्वरूपातच प्रदान केली. या सर्व ऑनलाईन प्रदर्शन प्रक्रियेचे सर्वांकडून कौतुक झाले.

अवघ्या जगावर येऊन ठेपलेल्या संकटाचा सामना करीत असताना प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करत सर्वांनी या वर्षी आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव साजरा केला. तसेच नयनरम्य आरास करून श्रींची भक्तीभावे सेवा केलीत, त्या बद्दल सर्वांचे आभार मानल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *