Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना पडताळणी करून मोबदला देणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना पडताळणी करून मोबदला देणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि.२४: पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे. चाळधारकांना गुणवत्तेनुसार पडताळणी करून घराचा मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली.

विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील दोन हजार चाळी पुणे-बडोदा महामार्गात बाधित होत असून चाळकऱ्यांनी आपली घरे प्रकल्पासाठी देण्यास सहमती दिली आहे प्रकल्पबाधित चाळकऱ्यांना मिळणारा मोबदला जागामालक हिरावून घेत आहेत याबाबत शासनाने केलेल्या कार्यवाहीसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पुणे-बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणी उपविभागीय अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण यांच्याकडे मुल्यांकन प्राप्त झालेले आहे.या बांधकामाचा मोबदला देण्यापूर्वी संबंधित जागामालक, बांधकाम करणारे बांधकाम विकासक आणि चाळीतील घर विकत घेणारे यांचे ना हरकत दाखले व हमीपत्र घेवून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच चाळधारकांना पडताळणी करून घराचा मोबदला देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सादर केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *