Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो तर्फे महाराष्ट्र-गोवामध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो तर्फे महाराष्ट्र-गोवामध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

पुणे, दि.२२: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालायचे प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे दोन्ही राज्यात जागतिक वसुंधरा दिन साजरा करत आहे. विभागाची क्षेत्रीय कार्यालये राज्यात उद्या हे कार्यक्रम घेत आहेत.

 

 

यामध्ये कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर; नांदेडमधील श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, हदगाव येथे; आमरावतीच्या विदयाभारती महविद्यालयात; घोडेगाव, खुलताबाद, औरंगाबादच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयात; सिद्धार्थ नगर, मखमलाबाद, नाशिक; देव धानोरा, कळंब, उस्मानाबाद येथे; पी. डबल्यू. एस. महाविद्यालय, कामठी मार्ग, नागपूर; खेडी, जळगाव येथे सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात; तर उत्तर गोव्यामधील रवींद्र भवन, साखळी येथे वसुंधरा दिन साजरा केला जाणार आहे.

 

या कार्यक्रमांच्या निमित्ताने आज देखील नांदेड, नागपूर येथे भित्तिचित्र, निबंध, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

 

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *