Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“पुणेकरांना सर्वात आधी कोरोना प्रतिबंधक लस द्या”

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स संघटनेची मागणी

पुणे: पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसारच्याच क्रमाने पण पुणेकरांना सर्वात आधी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स या संघटनेतर्फे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आली आहे.

पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार झालेली कोरोना प्रतिबंधक लस शिल्लक असून त्याचा वापर करून पुणेकरांना सर्वप्रथम ही लस देण्यात यावी अशी मागणी या संघटनेनं पत्राद्वारे केली आहे.

लवकर लसीकरण झाले तर कोरोनाची पुढील लाट थांबवण्यात आपण यशस्वी होऊ असंही या पत्रात म्हटलं आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *