Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे पुण्यात मतदार जागृती कार्यक्रम

पुण्यात होणाऱ्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमातून मतदानास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न

पुणे, दि. २१: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे कार्यालयातर्फे पुण्यामध्ये मतदार जागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्याच्या कसबा आणि चिंचवड मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवत मतदान करावे, यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे हा उपक्रम घेण्यात येत आहे. केंद्रीय संचार ब्यूरोचे चार नोंदणीकृत कलासमूह यासाठी कार्यरत आहेत. सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून मनोरंजनातून प्रबोधन करत हे कलाकार नागरिकांमध्ये मतदार जागृती करत आहेत.

गोंधळ, पोवाडा, नाट्यछटा, घोषणा अशा लेखनाचा वापर करत हे लोककलावंत नागरिकांना मतदान करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिनांक १३ फेब्रुवारी पासून २३ फेब्रुवारी पर्यंत हे जागृती कार्यक्रम होत आहेत. साधारण ४० कलाकार यामध्ये सहभागी आहेत. केंद्रीय संचार ब्यूरो, पुणेचे कार्यालय महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रमुख कार्यालय म्हणून काम पाहते. केंद्रीय योजना व नागरिकांच्या हिताचे विषय यासंबंधी जनजागृती करण्याचे काम हे कार्यालय करते. यासाठी विविध प्रचार-प्रसार माध्यमांचा उपयोग विभाग करत असते. गावोगावी, खेडोपाडी अधिकाधिक नगरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न हा विभाग करत असतो.

*

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *