पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्राइमटाइम मिनिस्टर, राहुल गांधी यांचे ट्विट
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आल्याची खबर मिळाल्यानंतरही तीन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फोटोशूटमध्ये व्यस्त होते. एका कार्यक्रमासाठी ते चित्रीकरण करत होते, असे सांगत नरेंद्र मोदी हे प्राइम मिनिस्टर नाहीत तर प्राइमटाइम मिनिस्टर अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.
पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण देशामध्ये अत्यंत दुःखद परिस्थिती निर्माण झाली होती, तसेच शहीद जवानांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसला असताना देशाचे पंतप्रधान मात्र हसत हसत फोटोशूट करीत होते, असे राहुल गांधी यांनी ‘फोटोशूटसरकार’ या हॅशटॅगखाली हे ट्वीट केले आहे.
पुलवामा में 40 जवानों की शहादत की खबर के तीन घंटे बाद भी ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ फिल्म शूटिंग करते रहे।
देश के दिल व शहीदों के घरों में दर्द का दरिया उमड़ा था और वे हँसते हुए दरिया में फोटोशूट पर थे।#PhotoShootSarkar pic.twitter.com/OMY7GezsZN
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 22, 2019
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याची खबर मिळाल्यानंतर सुद्धा तीन तास प्राइम टाइम मिनिस्टर फोटोशूटमध्ये व्यस्त होते, असे राहुल गांधी यांनी हिंदीमध्ये ट्वीट करत शेअर केले आहे.
गुरुवारी काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर आरोप केले होते. सुरजेवाला यांनी म्हटले होते की, मोदी जिम कॉर्बेट अभयारण्यात एका वृत्तवाहिनीसाठी फोटोशूट करत होते. सत्ता वाचविण्यासाठी मोदी शहीद जवानांनाही विसरले आहेत.
