मोदी सत्तेत आले, तर निवडणुका होणार नाहीत – पृथ्वीराज चव्हाण
पुणे: मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही आणि संविधान राहणार नाही. देेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशहा बनले आहेत. ह्या निवडणुकीत मोदी यांचा पराजय करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर टीका केली. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
देशातील आता पर्यंत सर्वात मोठ्या राफेल घोटाळ्यामधील भ्रष्टाचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवानगीने झाला आहे. ‘चौकीदार’ म्हणजे चोर आणि चोर म्हटला की आठवतं तो राफेल घोटाळा. चौकीदार आणि राफेल हे एक समीकरणच तयार झालं आहे, असेही ते यावेळी बोलले.
देशाच्या पंतप्रधानाना जनतेच्या अडचणीपेक्षा विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे जास्त महत्वाचे वाटते. यंदाच्या निवडणुकीत मोदींच्या भाषणातून ‘विकास’ शब्दच हद्दपार झाला आहे. त्यामुळे आता देशात विकास होईल की नाही याची खात्री बाळगता येत नाही. अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली
