Priyanka Chaturvedi
काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश
आज दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
प्रियांका चतुर्वेदी आडनावाप्रमाणे त्यांच्या संभाषण चातुर्यासाठी ओळखल्या जातात. काँग्रेस प्रवक्तेपद मिळण्यापूर्वी त्या कोब्रापोस्ट, तेहलका या माध्यमांसाठी स्तंभलेखन करायच्या. काँग्रेस प्रवक्ते पदी असताना भाजप वर शरसंधान करण्यात त्या आघाडीवर होत्या. हल्लीच त्यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक काव्यही केले होते. पण त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आता नवीन चर्चांना उधाण आलं आहे. भाजप वर अंकुश ठेवण्यासाठी तर त्यांचा उपयोग केला जाणार नाही ना?
