“कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान द्या” प्रवीण दरेकर यांची मागणी
नाशिक, दि.६: कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज नाशिक मध्ये केली. कांद्याचे भाव सतत घसरत आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना राज्य सरकारनं अनुदान द्यावं, आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही मागणी देखील त्यांनी केली.
राज्यात फडनवीस सरकार असताना अशाच प्रकारे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना त्यांनी २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं होतं, असंही ते म्हणाले.
