विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांचा ‘बेस्ट’ च्या आंदोलनात उतरण्याचा इशारा
मुंबई: कोरोना योद्धयांपैकी एक असलेल्या बेस्ट च्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे काही मागण्या ठेवल्या आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भाजपचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा राहील असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
या संदर्भात एका फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून प्रवीण दरेकर म्हणाले की, “बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा… मुंबईकरांचे जीव वाचविणारे योद्धे म्हणून बेस्ट कर्मचारी आता स्वतःसाठी लढतायेत… तर त्याचं ऐकायला हवं! त्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी! त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हांलाही त्यांच्या आंदोलनात मानवतेच्या भावनेतून उतरावं लागेल!”
