“हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा नोंदवा” – शिवसेना प्रवक्ते आ. प्रताप सरनाईक
मुंबई, दि.२: शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी हाथरस बलात्कार प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एक मागणी केली आहे. या संदर्भात एक ट्विट करत ते म्हणाले की, “देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो.”
देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना मी विनंती करतो.
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 2, 2020
गेल्या दोन दिवसांपासून हाथरस येथे पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यास माध्यमं व लोकप्रतिनिधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे. उद्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहे.
