देशभरात कोणतंही आकाशवाणी केंद्र बंद होणार नाही – प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण
देशभरात कोणतंही आकाशवाणी केंद्र बंद होणार नाही, तसंच त्यांची श्रेणीकपातही होणार नाही, असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत सांगितलं. ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा चालू होती.
कोविड प्रादुर्भावाचा आकाशवाणीच्या कामकाजावरही नक्कीच परिणाम झाला आहे. मात्र आकाशवाणीच्या उद्घोषकांनी कोविडसंदर्भात जनजागृतीचं मोठं काम केल्याचं, जावडेकर यांनी यावेळी नमूद केलं.
Source – AIR
